कर्ला गाव हा शहरापासून ३ किलो मिटर अंतरावर आहे. गावामध्ये हिंदू व मुस्लीम अशा दोन समाजाचे लोक एकत्र राहतात गावाचे क्षेत्रफळ हे कमी असून लोक दाटी वाटीने राहतात गावाला तिन्ही बाजूने पाणी आहे. गावाच्या पलीकडे ग्रुप ग्रामपंचायत कर्ला कार्यक्षेत्रातील जुवे गाव असून ते गाव एक बेट असे असून त्याला चारही बाजूने पाणी आहे. या गावात गणपती मंदिर दत्तमंदिर आहे गावात दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जुवे गाव निसर्गाचे विविधतेने नटलेले असून येथील उत्सव व सण साजरे करण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात.
कर्ला मुस्लिमवाडी या गावाला खाडी किनारा लागला असून गावातील व्यवसाय प्रामुख्याने मच्छीमारी आहे. तसेच कर्ला गावात निसर्गरम्य स्थळ असल्याने देशभरातून लोक गावाला भेट देण्यासाठी येत असतात. गावातील पर्यटकांसाठी बोटीने फिरण्याची देखील व्यवस्था आहे. गावात मस्जिद तसेच मंदिरे आहेत. कर्ला गाव हे पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर असे गाव आहे. गावामध्ये शिवकालीन तलावे आहेत.
						श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
						श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
						श्री.अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
						श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
						श्री. उदय सामंत
मा. मंत्री, उद्योग
तथा मा. पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा
						श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री,
ग्रामविकास व पंचायतराज विभाग
						श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी
						श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद